पूर्व तयारी : खाण्यापूर्वी तासभर आधी अंडी मधोमध आडवे कापून ४ अंड्यांचे ८ भाग करून बाजूला ठेवावेत. उकडलेला बटाटा बारीक किसणीवर कापून घेणे.
क्रमवार मार्गदर्शन: किसलेला बटाट्यात टोस्टचा चुरा, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, मीठ व कोथिंबीर एकजीव होईपर्यंत चांगले घट्ट मळून घ्यावे. मळताना हालाला थोडे तेल लावावे. तयार पीठाचे लाडवा एवढे गोळे करून घ्यावेत. ह्याच गोळ्यांना वाटी सारखा आकार द्यावा. ह्या पीठाच्या वाटीत मधोमध आडवे कापलेले अंडे ठेउन अलगद हाताने वाटीचे तोंड बंद करावे. हलक्या हातांनी दोन्ही तळहातावर दाब देत किंचीत चपटा आकार द्यावा. जास्त दाब देउ नये. तयार पॅटीस तासभर फ्रिज मध्ये ठेवावीत.
तासभरानंतर फ्रिज मधून काढून नॉनस्टीक तव्यावर तेल टाकून गुलाबी रंग येई पर्यंत परतून घ्यावीत.
गरम गरम टमाटो सॉस / चीली सॉस बरोबर वाढावीत.
अंडे आपण फ्रिज मध्ये ठेवतो ते उभे ठेवतो. येथे अंडे मधोमध आडवे कापायचे आहे - उभे नाही ! तळताना दोन दोन च्या संख्येत तळल्यास करपण्याची शक्यता कमी असते. मधल्या वेळेत माकड खाणं म्हणून बरे लागतात. आवडत असल्यास पीठ मळताना हिंग /थोडे जीरे/ओवा वगैरे टाकल्यास चव येते. स्टार्टर म्हणूनही सर्व्ह करता येतात.
सौ ची मैत्रीण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.