कणकेचा केक

  • १ वाटी कणीक
  • १ वाटी मिल्क पावडर
  • १/२ वाटी तूप
  • पाउण वाटी पिठीसाखर
  • १ १/२ वाटी दूध
  • १/४ चमचा सोडा व १/४ चमचा बेिकंग पाव्डर
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

१. कणीक, मिल्क पाव्डर व पिठीसाखर एकत्र करून घ्या.
२. त्यात दूध व पातळ करून तूप घाला व सर्व मिश्रण चांगले फेटून घ्या.
३. त्यात बेकिंग पावडर व सोडा घाला.
४. हे मिश्रण खूप घट्ट बनवू नये, थोडे सैल्सर असावे.
ं५. आता एका माय्क्रोवेव प्रूफ भांड्याला थोडे तूप लावून त्यात वरील मिश्रण ओता व १५-२० िम. "मिडीयम हाय" वर बेक करा.
६. मायक्रोवेव ऐवजी ओव्ह्न मध्ये ही १०-१५ मि. त हा केक होतो.

दूध हे ठराविक प्रमाणातच घालावे असे नाही. मिश्रण सैलसर होइल इतके दूध घालावे.
वरील प्रमाण हे मी माझ्या स्वताच्या अनुभवा वरून लिहिले आहे.

एक ओळखीच्या काकु