काही क्षण सुखाचे, काही क्षण दुःखाचे
काही क्षण क्षणिक, काही अगणिक
काही क्षणांनी जीवन फ़ुलविले,
काही क्षणांनी सुख विसरविले
-
काही क्षण आहेत अनमोल,
काही क्षण कवडीमोल
क्षणासाठी आम्ही तुम्ही, तुम्ही आम्ही
काही क्षणांत कोण तुम्ही कोण आम्ही
-
काही क्षणांनी दिला आठवणींना उजाळा
काही क्षणांनी दिला भविष्याचा निर्वाळा
काही क्षणांनी मन सुखविले
काही क्षणांनी हृदय हेलाविले
-
क्षणामध्ये होत्याचे नव्हते
क्षणात कुठून तरी आर्वतले
क्षणात आले क्षणात गेले
क्षणात उरले क्षणात संपले
-
क्षण असेच सरायचे
आयुष्य असेच संपायचे
क्षणांची ठेवावी थोडीतरी किंमत
गेलेले क्षण येत नाहीत परत
--अतुल काळदंते