भरली कारली

  • ४ मध्यम आकाराची हिरवी कारली
  • ओलं खोबरं (खोवलेलं) - १ वाटी
  • आल लसुण पेस्ट - १ चमचा
  • लाल तिखट/ कांदा-लसूण तिखट - चवीनुसार
  • दाण्याचे कुट
  • फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद)
  • तेल, गूळ, मीठ, कोथींबीर
  • पुड्याचा दोरा
३० मिनिटे
४ जणांसाठी

प्रथम कारली मधोमध कापावीत(आडवे काप घ्या) . व नंन्तर उकडून घ्यावीत. ऊकडलेल्या कारल्याला एक काप देवुन त्यातील बिया काढुन टाकाव्यात. [ ह्याने कडुपणा निघुन जातो.]

खोबरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट,दाण्याचे कुट, गूळ, मीठ, कोथींबीर एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण कारले भरण्यासाठी वापरावे.

भरलेल्या कारल्याला दोरा गुंडाळावा. [हे मसाला बाहेर पडू नये म्हणून]

तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करावी व त्यात भरलेली कारली परतून घ्यावीत.

रसभाजी साठी प्रमाणात पाणी घालून उकळी द्यावी.

सासूबाई