एकदाच

एकदाच.........

एकदाच बरसून जाशील ,

श्रावणसरी बनून माझ्या आयुष्यात ,

माझ्या हिरव्या मनाला मात्र सवयच होईल ,

गारव्यासाठी ! तुझी वाट पाहण्याची.

तू मात्र येणार नाहीस... हट्टी पावसासारखी.

श्रावणसरी एकदाच बरसतात...

नंतर गारवा निघून जातो.

बरसत राहतो पाऊसच निरंतर.......... रौद्रावतारात

सुखद सरींचा पत्ताच नसतो..

तुला नाही वाटत... तुझ वागणंही असंच

श्रावणसरींसारखं..... हातचं राखून वागणारं

दुट्प्पीपणाचं !