आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये

आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये

जन्म घेउन दाखल होता येते

विकारासारखी भूक ही वाढते

म्हणून अन्नाचे ओषध पियावे लागते ॥ १॥

आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये

सुखातून दु:खाची जाणिव कमी होते

पण त्यासाठी दारू नाही सलायन लागते ॥ २॥

आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये

शरीर थोडे विसावले की मग

डॉक्टर नाहीतर नाही यमाने तरी

डिस्चार्ज करावेसे वाटते  ॥ ३॥

आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये

अजून काहीतरी बाकी म्हणून

देहदान करावे लागते

खिशात कारण पॅसे नाही

म्हणून परतफेड ही करावे लागते ॥ ४ ॥