अमिताभ

(लहानपणी केलेली कविता...)

एकदा मला वाटलं
अमिताभ झालोय मी
व्हीलनशी केली मारामारी
वापरला नाही डमी
           ठोशामागून ठोसे
          देतच होतो त्याला
          त्याचा एकही ठोसा
          लागला नाही मला
पण शेवटी थाडकन
बसली त्याची बुक्की
डोळे मिटून घेतले,
वाटलं, मरतोय नक्की
        जेव्हा डोळे उघडले
        समोर दिसले ड़ॉक्टर
        आणि हादरलो मात्र
        बघून पायाला प्लास्टर
आई म्हणत होती,
काय झालं रे ?
झोपेत कॉटवरून
कसा पडलास रे ?