भचिमणे चिमणे रडू नको
आईचा पदर ओढू नको
सोपवते तुज बाईंच्या हाती
शाळेला कधी टाळू नको
चिमणे चिमणे झालीस मोठी
पंख पसरून उडण्या साठी
भरारी घेताना भिऊ नको
उंच उंच जाण सोडू नको
चिमणे चिमणे रडू नको
सुटले घरटे समजू नको
संसारी केली तुझी पाठवणी
कमी स्वत:स लेखू नको
चिमणे चिमणे झालीस मोठी
टिपशील दाणे बाळा साठी
ही शेवटची गं बाळे पाठवणी
आता चिमणू राहू नको
चिमणे चिमणे झालीस मोठी
चिमणं गोष्टी विसरू नको
चिमणे चिमणे रडू नको
चिमणे चिमणे रडू नको
=========================
स्वाती फडणीस................ २००-०६-२००८