मुळ्याचा पराठा

  • १ मोठा मुळा खिसून
  • १ चमचा लसुण-जिरे पेस्ट
  • चवीनुसार तिखट
  • १/२ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • ३ वाट्या कणिक
  • ४ चीमटी ओवा
  • कोथिंबीर
  • बटर
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
३० मिनिटे
४ जण

कणकेत ओवा, कोथिंबीर, थोडी हळद, मीठ, थोडे बटर, थोडे तेल घालून मळावी.

आता एका भांड्यात तेल घ्यावे, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, लसुण-जिरे पेस्ट, तिखट, हळद, खिसलेला मुळा, मीठ टाकून परतावे. मुळा जास्त शिजू देवू नये, सर्व पाणी जीरून भाजी कोरडी झाली पाहिजे.

भाजी गार झाल्यावर, कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटावा.

दोन्हीकडून तेल लावून भाजावा आणि शेवटी बटर लावावे.

गरम गरम वाढावा.

शेंगादाण्याची चटणी, लोणचे आणि दह्यासोबत सर्व्ह करावा.

माझी मावस बहिण