उपासाचा डोसा

  • भगर - ३ लहान वाट्या, साबुदाणा - १ लहान वाटी भरून
  • चवीपुरते मीठ
  • चटणीसाठी- ओले खोबरे (१ वाटी खवून), मिरची-१, मूठभर निवडलेली कोथिंबीर
  • १" आले, चवीपुरती साखर, लिंबू, मीठ
  • भाजीसाठी -३ बटाटे उकडून, चमचाभर दाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून
  • तूप/तेल,
१५ मिनिटे
३-४ जण

रात्री वरई (भगर) व साबुदाणा नीट धुवून वेगवेगळे भिजत टाकावे. दुसरे दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेवून एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून ३ तास झाकून ठेवावे.

डोसे करतेवेळी नॉन्स्टिक तव्यावर वाटीने फिरवून दोसे घालावेत.

अमूल बटर, हिरवी चटणी व सुक्या बटाट्याच्या उपवास भाजीबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.

नेहमी तीच ती खिचडी खाऊन कंटाळा येतो.

(काकडीचा कीस, मिरची-कोथिंबीर पेरून, जाडसर उत्तपेही घालता येतील!)

स्वतः