कधी कधी वाटतं

कधी कधी वाटतं, त्याच्या घरातला T.V. व्हावं,
नकळतपणे का होईना, त्याच्या डोळ्यासमोर राहावं;

कधी कधी वाटतं, त्याची bike व्हावं,
त्याच्यासोबत दूरदूर हिंडावं;

कधी कधी वाटतं, त्याचा mobile व्हावं,
त्याच्या खिशात त्याच्या हृदयाजवळ राहावं;

कधी कधी वाटतं, त्याची उशी व्हावं,
त्याला मांडीवर घेऊन, त्याचं डोकं थोपटावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या कुंडीतलं फुल व्हावं,
त्याने प्रेमानं जवळ घेऊन मला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, वारा व्हावं,
त्याच्या केसातून हात फिरवत, मी त्याला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, एक newspaper व्हावं,
त्याच्याशी नजर भिडवत, त्याच्या डोळ्यांत मिसळावं;

कधी कधी वाटतं, आरसा व्हावं,
तो स्वत:ला न्याहाळत असताना, मी लाजेनं चूर व्हावं;

कधी कधी वाटतं, त्याच स्वप्न व्हावं,
त्याच्या स्वप्नात जाऊन, त्याला जवळ घ्यावं;

कधी कधी वाटतं, एक थेंब व्हावं,
फक्त आनंदाच्या आणि आनंदाच्याच क्षणी त्याच्या गालावरून ओघळावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या भावना व्हावं,
त्याचं माझ्यावर प्रेम आहे का???????
या प्रश्नाचं उत्तर शोधावं..........