कुरकुरीत कारले

  • ५ -६ कारली,
  • ओला नारळ,
  • हळद पाव चमचा
  • २ पळ्या तेल.
  • मीठ,
३० मिनिटे
३ जणांसाठी

प्रथम कारले बारीक कापून घेणे. मग त्या कारल्या ला जाड मीठ लावून त्याचे पाणी काढणे व पाण्यात भीजवीणे नंतर कढईत तेल गरम करून त्यात कारले टाकावे, तेलात चांगले परतून घ्यावे. मग वरून हळद व बारीक मीठ चवीपूरते टाकावे. कारले तांबूस कलरचे झाल्यावर गॅस बारीक करून त्यात ओला नारळ टाकावा व कारले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. गरम गरम कारले भाकरी बरोबर फारच छान लागते. 

हळद पावडर ऐवजी मीरची पावडर पण टाकू शकता तसेच राई जीरंही फोडणीला टाकू शकता.

स्वत: