तिरंगा

हा तिरंगा प्यारा मजला

ही माझी जान आहे.

जय हिंद सर्वदूर

 ह्याचीच शान आहे.

वंदन करतो तिरंग्याला

ताठ माझी मान आहे

हृदयात देश्भक्ती अन

ओठात राष्ट्रगान आहे.

रक्षणार्थ हजर ह्याच्या

क्षुद्र माझा प्राण आहे

द्रोह्याच्या पायरवाकडे

तीक्ष्ण माझा कान आहे.

मेले मरतात मरतील कित्येक

माणसांचे माजले रान आहे

देशासाठी मरणार्यांची

आज मात्र वाण आहे.

उचलला नांगर पाहा

समोर काळे रान आहे

मी भारतीय आहे

याचा मला आभिमान आहे.