मनात आहे भरला पेला
पिउनी कितीदा खाली केला
वाटे सरला परंतु भरला पुन्हा
असा गमतीचा पेला .. १
मनातले सोडा अन बर्फ
मनातले कसलेसे दर्प
मनालच मग चढते धुंदी
आणिक नुरते कसली बंदी... २
कलिकान्संगे मग मन खुलते
वार्यासंगे मग ते झुलते
कड्या - पिंजरे तोडुनी सारे
पक्षी बनुनी उडुनी जाते... ३
नशेस लागे दारू - गांजा
हा तर भलता गाजावाजा
नशेस लागे सळसळ रक्त
आणि मनातिल पेला ताजा...४