प्रेम

तव नयनांचे गहिरे काजळ जेव्हा बनते धुंद सुरा
अन् ओठांचे थरथरणे ते, त्या चषकाचा भास खरा
बुडून जातो स्वप्नामध्ये तुझ्या मिठीच्या, प्राणसखे!
नकोस स्पर्शू हलकेही मज उठवाया तू, थांब जरा!

आकर्षक ते गोंदवणाचे फूल जणू मज खुणावते
हनुवटीस त्या स्पर्शुनि माझी तुजवर प्रीती दुणावते
ह्या केसांच्या वादळात मी योग्यासम संयत राहू?
वाट पाहतो साखरकळिच्या स्पर्शाची, तू देच जरा