मिलन

धुंद एकांत, क्षणही शांत,
दोन जीवांची, गुंतागुंत.

अशी अनामिक, ओढ़ एक,
दोन्ही देही, घालमेल.

श्वासात श्वास, एक आस,
हृदय झाले, प्रेमातुर.

तनूस तनू, स्पर्शास स्पर्श,
स्पर्शातून उमले, नवीन अर्थ.

हृदयास हृदय, ओठास ओठ,
हवेहवेसे हे, अमृत.

धुंद देह, बेधुंद आवेग,
दोन जीवांचे, झाले मिलन.