त्रिवेणी लाडू

  • प्रत्येकी एक वाटी मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, दोन वाट्या ओलं खोबरं.
  • साजूक तूप, ३-४ वाट्या पिठी साखर, वेलची पावडर
४५ मिनिटे
३-४ जणांसाठी

तिन्ही डाळी ५-६ तास स्वतंत्र भिजवून वेगवेगळ्या वाटून घ्याव्यात. नंतर वाटलेल्या डाळी एकत्र करून तो गोळा भरपूर तूपावर चांगला भाजून घ्यावा. ओलं खोबरं थोडं परतून घेऊन या भाजलेल्या गोळ्यात घालावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर, वेलची पावडर घालून लाडू वळावेत.

साजूक तूप व पिठी साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.

काकू