बरिस्तात जाऊन Coffie प्यायची
की CCD तला थंड चहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
कधी Mc'd चा बर्गर खा
नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
तिला घेऊन खडकवासला
की कार काढून लोणावळा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
दररोज फोन calls आणि SMS
करावे लागतील तिला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
प्रेम हा विषयच आमचा कच्चा
ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
अहो, ह्या कसल्या
प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
एकटं राहायचा ताप आलाय
म्हणून कविता लिहिण्याचा प्रपंच सारा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
प्रेमाच हे गणित
कळलंय तरी का देवाला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
तुम्ही तरी काय सांगणार मला?