सन्सेक्सबुवा सन्सेक्सबुवा उठा आता उठा, सेन्सेक्सबुवा.. उठा
इनव्हेस्टमेंटची साऱ्या तुम्ही केली मोठी थट्टा
... आता उठा... आता उठा
कनवटीला दिडक्या होत्या स्वप्न होती मोठी
दुप्पट करू, डीमॅट उघडू म्हटलं चढेल निफ्टी
कसला मिडकॅप कुठला स्मॉलकॅप निव्वळ खेळलो सट्टा....... आता उठा
कुठून जळलं ऐकलं अन मार्केटमध्ये घुसलो
ब्रोकरशी कुठल्या, कधी नातं जोडून फसलो.
वर वर दिसला फायदा आणि नशिबी आला तोटा ...... .... आता उठा
सारे करतात म्हणून आम्ही देखिल केलं
शेअर्सच्या फंदात लाखाचं खाकच झालं
पाळी अमुची आली नाजुक, तुमचे टोमणे निदान आवरा....... आता उठा
आवांतर: 'विहीणबाई विहीणबाई उठा आता'.... या बाल गीताच्या चालीवर आहे. चारोळ्या लिहिण्याचा पहीलाच प्रयत्न..... जमलं म्हणायचं का?