माझं वय

काय वय आहे तुमचं,

   रिसर्वेशनवाला विचारत होता,

काय सांगू त्याला मी?

   माझाच मला पत्ता नव्हता.

पहाटे जेंव्हा माळीकाका

   बागेत पाणी घालत असतो.

तेंव्हा मी आरामात घरी

  घोरत पडला असतो,

रिक्षेमधूनही ट्रॅफिकमुळे

    ओफिसला उशीर होतो.

वोचमनकाका चालत चालत

  कधीच पोचला असतो.

कोलेज सोडून ओफिसला जायचं

   म्हणून मी रोज रडत असतो,

धा वर्षाचा रवी कधीचा

   पेपर विकत असतो.

काय वय आहे तुमचं,

   रिसर्वेशनवाला विचारत होता,

काय सांगू त्याला मी?

   माझाच मला पत्ता नव्हता.

काय सांगू त्याला मी?

   मलाच माझं कळत नसतं

मला वाटत माझं वय

   सारखं बदलत असतं