आयुष्याच्या ह्या वळणावर...

आयुष्याच्या ह्या वळणावर
तुझीच वाट पाहतो मी
चोहीकडे तुला शोधत
भरकटत जातो मी

रडतेस जेव्हा तू
डोळ्यात तुझ्या स्वतःला पाहतो मी
नकोस लपवू थेंब ती
भेट दिली आसवे तुला मी

आकाशाच्या ह्या पडद्यावर
तुझे चित्र रेखाटतो मी
पावसाच्या थेंबा थेंबात
तुझे अश्रू वेचतो मी

कधीतरी आठवण येईल माझी
वेडी अपेक्षा करतो मी
चोहीकडे तुला शोधत
भरकटत जातो मी

तुझ्यासाठीच जगलो मी
आणि संपलोही तुझ्यासाठीच मी
आयुष्याच्या ह्या वळणावर
तुझीच वाट पाहतो मी

चोहीकडे तुला शोधत
भरकटत जातो मी
चोहीकडे तुला शोधत
भरकटत जातो मी