हा कोरा कागद मला विनवण्या करतो

हा कोरा कागद मला विनवण्या करतो
दोन चार शब्दांसाठी एकटक माझ्याकडे पाहतो

मग मलाही त्याची दया येते, मी लिहायला बसतो
आज काय लिहिणार, असा विचार त्याला नेहमीच पडतो

पेन घेऊन जेव्हा मी त्याला गुदगुल्या करतो
हाच तो कागद मला  लिहायला उद्युक्त करतो

हळुवार वाऱ्यावर माझ्याबरोबर तोही झुलतो
आणि झुलता झुलता कविता लिहायलाही तोच कारण देऊन जातो

हा कोरा कागद मला विनवण्या करतो
दोन चार शब्दांसाठी एकटक माझ्याकडे पाहतो