ठसे
.
सुखावलं की हसायचं..
मनोमन फुलायचं!
दुखावलं की रडायचं..
आतल्या आत कुढायचं!
सुख दुःखाच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा सुखाचा!
एक ठसा दुःखाचा!
एक ठसा खोल उमटून,
एक नजरेतून गेला सुटून..
एका ठशात पाणी साठून,
एक लाटेत गेला वाहून..
मागे वळून पाहताना मग..
तळीच येतात दिसून!!
तळ्यां काठच्या सागरी
फेणफुले जाती गळून!
==========================
स्वाती फडणीस........ ०५-०७-०८