एखाद्या रम्य संध्याकाळी मनातून
डोकावते साठवणीतली आठवण
मग हळुवार उघडले जातात
मित्रमैत्रिणींबरोबर घालवलेले क्षण
आयुष्यातले रंगीबेरंगी ते दिवस
फुलपाखरापरी उडून जातात
पाठीमागे आठवणीरुपी
रंगसुगंध सोडून जातात
आठवण येते जेव्हा कधी त्यांची
नयनांतून अश्रू ओघळतात
आपण वेगवेगळ्या वाटान्नी पुढे जातो
ते क्षण मात्र तिथे तिथेच राहतात.......
- आरती