तोंडल्याची भाजी

  • अर्धा पाव तोंडली
  • २ बटाटे
  • अर्धी वाटी दाण्यांचा कुट
  • तिखट - मीठ
  • फोडणीसाठी कडीपत्त्ता-तेल-जिरे-मोहरी- हळद
  • कोथिंबीर
१५ मिनिटे
४-५ जणांसाठी

तोंडल्याच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. बटाट्याच्या पातळ चकत्या ( लहान आकारात) करून घ्याव्यात. कढईत तेल टाकून त्यात फोडणीचे साहित्य घालावे.तिखट घालावे. त्यात तोंडली व बटाट्याच्या चकत्या परतून घ्याव्यात. दाण्यांचा कुट व चवीपुरते मीठ घालावे. शिजण्यासाठी थोडेसे पाणी घालावे. मंद आच करून झाकण ठेवावे. थोड्यावेळाने कोथिंबीर पेरावी व पाच मिनिटान्नी गॅस बंद करवा.

झटपट होते  आणि छान लागते.

मैत्रिण