असतोस कुठे सांग!

.

दिशे दिशेस तुझाच भास..
घननीळ्या.. घनश्यामा,
असतोस कुठे सांग!

माथ्यावरती निळे निळे..
पसरून गगन अफाट,
तुझाच का तो, प्रेमळ हात!

सात पर्वतां पल्याड दिसते..
निळी निळी एक रांग,
कटता कटेना अंतराय!

निलसागरी लहरी, लहरी..
येती-जाती, अविरत गाती,
तुझेच गीता सार!

जळीस्थळी तुझाच आभास..
घननीळ्या.. घनश्यामा,
असतोस कुठे सांग!

=======================
स्वाती फडणीस................ १०-०७-२००८