आयुष्य झाडासारखे उपटले
तरी अवघड असते
दुसरीकडे मुळे रुजणे
तुटून निघालेली मुळे
घट्ट धरू शकत नाहीत
दुसरीकडची माती.
कठीण असते बहरास येणे
आणि त्याहूनही कठीण असते
फुलांचे सुगंध उधळणे
म्हणून मुळांनी घट्ट धरून ठेवावी
आपली स्वतःची माती
आणि राहावे ताठ उभे!
मग पानोपानी फुले बहरतात
आणि ओझे होत नाही
बहराच्या डोलाऱ्याचे!