सहवास

मधुर शितल रात्री
चांदणे बरसते दारी
दरवळे मंद सुवास
हा ..., तुझा सहवास ।

बासरीचा मोहक सूर
राधेचे हरले भान
गोकुळी रंगीला रास
तुझाच रे, तुझा सहवास ।

उसळे फेस चषकातून
अंगी मादक धून
धुंद लयीतला श्वास
तुझाच रे, तुझा सहवास ।

उमले नवी एक आस
सत्य असे की भास
...... हा तुझा सहवास
तुझाच रे, तुझा सहवास ।