तू...

तू वावटळीगत
नकोस येऊ
मी पाचोळ्यागत
विस्कटतो...
तू प्रलय होउनी
नकोस वाहू
बेभानपणे मी
भरकटतो...

तू झुळुक होउनी
जवळ राहा
मी मोहरून
जाईन अशी...
तू सर एखादी
होउन ये
मी चिंब-चिंब
नाहीन अशी...