फरसबीची सोप्पी भाजी

  • फ़रसबी
  • बटाटा
  • मिरच्या
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • हळद
  • चवीपुरते मीठ
  • १ चमचा साखर
१५ मिनिटे

बटाटा आणि फरसबीची भाजी बारीक चिरून घेऊन कुकर मधून २ शिट्ट्या काढून वाफवून घ्यावी.

बटाटा सोलून छोटे तुकडे करावेत.

एका पळीत तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद व मिरच्या घालून फोडणी करावी.

शिजवलेल्या भाजीमधे फोडणी चान्गली मिक्स करून त्याच्यात मीठ व चवीपुरती साखर घालावी. वरून लिंबू पिळावे की भाजी तयार.

उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पिळू नये. भाजी खराब व्हायची शक्यता असते.

सासुबाई