मटार पनीर वडे

  • पाव किलो मटार दाणे, पाव किलो पनीर, १ कांदा, १ मोठा बटाटा उकडून घेतलेला, पाव वाटी ओलं खोबरं,
  • १ टिस्पून आलं-लसूण पेस्ट, ३-४ हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर,
  • अर्ध लिंबू, चवीपूरतं मीठ आणि साखर,
  • दिड वाटी डाळीचं पीठ, प्रत्येकी अर्धा टिस्पून हळद, तिखट, चिमूटभर खाण्याचा सोडा (ऐच्छिक ),
  • तळण्यास तेल.
१ तास
२-३ जणांसाठी

मटार दाणे मिक्सर मधून भरडून घ्यावेत. पनीर व उकडलेला बटाटा किसून घ्यावा. कोथिंबीर+हिरव्या मिरच्या+कांदा मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.

आत कढईत २ टेबलस्पून तेल टाकून त्यावर कांद्याचे वाटण + आलं-लसूण पेस्ट परतावे.   त्यात मटार वाटण घालून झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणावी. आता त्यात किसलेले पनीर, बटाटा, चवीपूरती साखर आणि मीठ घालावे. नीट परतावे. पून्हा झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ आणावी व उतरावे. लिंबू पिळून नीट ढवळून घ्यावे. गार झाल्यावर त्याचे लिंबाएवढे गोल गोळे करून ठेवावेत.

आत बेसन, मीठ, तिखट, सोडा एकत्र करून बटाटेवड्याइतपत घट्ट पिठ भिजवावे. त्यात मटार-पनीर सारणाचे गोळे बूडवून बटाटेवड्यासारखेच तळून काढावे.

मटार ऐवजी ओला हरभरा वापरूनही वडे छान होतात.

मैत्रीण