आनंदघन

आनंद घन बरसला
निवाल्या अनलाच्या ज्वाला

उमलली कोमल तनू कांती
सूर ये कोकिळेच्या गळा

चंचले नवथर रूप खुले
पांघरून लज्जेचा शेला..

शोभली सालंकृत साजणी
कटीवर रूणझुणते मेखला

दर्शना हर्षभरे साजणा
मोहिनी सजणी च्या भुलला

तारका मंद मंद जाहल्या
प्रीतीचा सौरभ दरवळला

शर्वरी अमृत गंधलेली
सुधारस अवनीवर सजला

माधूर्य माधवी अशी
फुलविते मधुचंद्राच्या फुला........

सुरुची नाईक

२६ नवीन स्नेह नगर

नागपूर