गोडवा

.

घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू!
डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!!

निळ्या करड्या दर्यात, जलद सूर घेऊ!
नाती ज्ञाती निरखत, जीवनाचा तळ गाठू!!

चल पुन्हा एकदा, पेन उधार घेऊ!
खाऱ्या खऱ्या पाण्यात, गोडवा शोधूत राहू!!

=======================
स्वाती फडणीस.............. १७-०७-२००८