कठोर

काळोखात बुडल्यावरती एवढेच आठवते

प्रकाशाच्या गावी माझे पूर्वी घर होते




आज दाटे भोवताली सांज पुन्हा अवेळी


कालच तर मध्यान्हीचे इथे राज्य होते




झाले सारे बोलूनही, आता काय उरे?


मनी माझ्या अक्षरांचे कारंजेच होते




दुःख मोठे पेलायाला मोठे मन हवे


नावे मोठी घऊन का इथे काही होते?




शब्द गेले स्वप्न गेले पंखसुद्धा गेले


जगायाला असे काय मागत मी होते?




श्वास थांबेतो इथे मी जगेनही आता


मरणही माझ्यासाठी कठोरच होते


अदिती
(१८ जुलै २००८,
गुरूपौर्णिमा शके १९३०)