`लेलें'च्या `शोधा'त अनेकजण सहभागी होऊ इच्छितात, हे त्या कथेवरील प्रतिक्रियांवरून लक्षात आलं.
`.... त्यामुळे हे लेले कोणीही असू शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल! ' हे एका वाचकाचं मत अगदी पटलं, आणि वाटल,
आपण सगळेच त्या `आपल्यातल्या' लेलेंना शोधू या.
मागं मी समतोल फाऊंडेशनविषयी लिहिलं होतं. अनेकांनी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांचा व्याप वाढतोय. रेल्वे फलाटावर भरकटलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कल्याणजवळ एक कायमस्वरूपी शिबीर सुरू असते.
या मोठ्ठं काम करणाऱ्या संघटनेच्या छोट्याशा कार्यालयाला आज एखाद्या जुन्या, कामचलाऊ संगणकाची गरज भासते आहे.
आपल्यासारख्या अनेकांचा दिवस संगणकासमोरच उजाडतो, आणि मावळतो.
`समतोल'साठी काही करायची इच्छा आहे? फाऊंडेशनचे तळमळीचे कार्यकर्ते विजय जाधव यांच्याशी ९८९२९६११२४ या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क साधा, आणि सत्कार्याचे समाधान मिळवा.
हे केवळ आवाहन आहे.
अधिक माहितीसाठी, दुवा क्र. १ इथे भेट द्या...
लेलेंच्या कामात आपलाही, खारीचा वाटा उचलू या.