गाजराच भरीत

  • ४ गाजरं
  • ३ हिरव्या मिरच्या
  • १ काडी कढिपत्ता
  • कोथिंबिर
  • हिंग , मोहरि, जिरे
  • दही
३० मिनिटे

गाजर धुवून साल काढुन, कुकर मध्ये एका ताटली मध्ये ठेवून उकडुन घ्या.

मग हाताने कुस्करून  घ्या.

त्यावर मिठ , साखर घाला .

कढल्यामध्ये चमचा भर तेल घाला, गरम झाल्यावर मोहरी घाला, जिरे , हिंग मिरचिचे तुकडे , हळद घाला

हि फोडनी कुस्करलेल्या गाजरावर घाला. एकत्र करा.

थंड झाल्यावर दही किवा लिंबू पिळा. वरून बारिक चिरलेली कोथिंबिर घाला.

रुचकर भरित तयार

साखर जरा मोथ्य हाताने घाला . आंबट गोड छान लागते भरीत....

आजे सासुबाइ