जाहले, जे घडुनी गेले, त्यां आठवणे व्यर्थ आहे,
चक्र काळाचे पुन्हां उलटे फिरविणे, शक्य का रे?
मांडलेला डाव, जो उधळून दिधला तू स्वहस्तें,
त्यातली रंगत फिरूनी आणणे तुज शक्य का रे?
बांधुनी, कवटाळुनी, जखडून ठेविशी जरी अता रे,
उडुनी गेले कापरासम, रंग नात्यातील सारे..
वाळल्या कुसुमात शोधिशी रंग बरवा तू अता रे,
रंगही ना, गंधही ना, गळुनी पडले भूवरी रे....