संस्कृती ..

उपाशी असताना  जेवणं ही प्रकृती..........

उपाशी पोटी दुसरयाची भाकरी घेण ही विकृती आणि

उपाशी पोटी आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी दुसर्याला देण हीच खरी संस्कृती

संस्कृती माणसाला शिकवते सुसंस्कृतपणा..... निसर्गान माणसाला मुक्त हस्तान दान दिल... परमेश्वरान हे दान स्विकारणार्या माणसाला एक मन दिल  आणि या स्वछंदी मनाला आवर घालायला एक तल्लख बुद्धी दिली. भाग्यवान मनुश्याने त्याच सोन केल अन संस्कृतीच्या सोनेरी  फुलाला रुप दिल. या फुलाचा सुगंध प्राचीन काळापासून विश्वाच्या कणाकणातून दरवळत आहे.