कोणी माझी ओळख करून देइल का हा कोण आहे मी
कोणी सांगेल काय मला, खरंच कोण आहे मी?
कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ,
कोणाचा तरी बाप
काका, मामा, दादा,
पण हे तर माझे,निव्वळ मुखवटे
[निव्वळ डुप्लिकेट आयडी.]
मग खरा कोण?
ठरवतो मी खुपदा विश्वासून बुद्धीवर,
हे करू, ते करू, ठरवतो राहून शुद्धीवर,
पण बिनचुक करुनही सगळं
असं कसं चुकतं
सारं कसं फसतं?
कळत नाही मग मला माझं हे न चुकताही चुकणं
जाणवत आहोत की काय कोणाच तरी खेळणं
माझं सगळच कसं नियंत्रित-चालणं, बोलणं, हसणं?
पण हे चालवून कसं घ्यायचं,
तो हलवेल तसं आपलं हलणं.
पण.... पण.....
खेळण्याला कुठे असते मनाप्रमाणे हलण्याची मुभा
बालक हलवेल तसंच हलण्याची असते त्याला सजा
तरिही हा प्रश्न उरतोच
पण मग मी कोण
स्वतंत्र बुद्धी असलेला माणूस
की त्याच खेळण अमानुश?
नियतीच बाहुला?
तो दोऱ्या हलवणारा
आणि त्याप्रमाणे नाचणारा मी
फक्त एक बाहुला हो बाहुलाच
स्वत:च काहीच नसणारा.
तरीही स्वत:वर गाढ विश्वास असणारा--एक अंधश्रद्ध.