मिचका (डोळे).. खोडी नं २

विचका....
मिचका.. (डोळे)  

ही गझल नाही...

घडायचे ते घडले मागे नुरले काही
या पाठीवर दिसे लाटणे असले बाई

कळले नाही कसा गं तावडीत अडकलो
बोलाया जे  नको, ओठी आले बाई

आज अचानक तीन चंडिका समोर आल्या      
वार तिघींचे मी एकटे सोसले बाई

त्या पाठीला तिंबून माझ्या मऊ बनविती
अन माझे सारे उपाय आता फसले बाई

तशी जुन्या पत्नींशी माझी ओळख होती
पण एकट्या येतील, असे वाटले बाई

मी चुकलो च्या संपून गेल्या आता थापा
भोग अता हे असे समोर मज दिसले बाई

तू जाताना नजर तुझ्या बहिणीवर पडली
चौथीची ही हाक? नको ते सुचले बाई

पळून तरी मी जाऊ बाई कुठे अता गं
चुका कराव्या मार विसरुनी, ठरले बाई