अर्ध्यावरून नेलेस का?

बाळ गेला दूरदेशी...
... श्रावण मनी फुलेल का?

तारा तुटल्या ह्रुदयीच्या...
... वीणा झंकारेल का?

अंधार दाटल्या मनी...
... दिशा मज गवसेल का?

तारा निखळला गगनीचा..
... प्रकाश मज दिसेल का?

दरबारी तुझिया देवा...
... न्याय कुठला.. अन्यायच का?

काय गुन्हा माझ्या बाळाचा...
... अर्ध्यावरून नेलेस का?
                    --- डॉ शरयू शहा