कोकोच्या वड्या

  • १०० ग्राम मिल्क पावडर
  • १/२ वाटी कोको पावडर
  • १/२ वाटी लोणी
  • सव्वा वाटी साखर
  • बदाम तुकडे (ऐच्छिक)
३० मिनिटे
१ मध्यम डबा भरून वड्या होतात.

मिल्क पावडर+कोकोपावडर एकत्र करून चाळून घेणे‌. साखरेचा पक्का गोळीबंद पाक करणे. लोणी पाकात घालणे. गॅस मंद करून हलवणे. आता गॅस बंद करून भांडे खाली घेऊन त्यात कोको पावडर+मिल्क पावडर घालणे  व गुठळी होऊ न देता ढवळणे.हवे असल्यास बदामाचे  तुकडे घालणे.एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रण घट्ट झाल्यावर  वड्या थापणे.

नाहीत

.