जेव्हा शब्दशोध करवतो अर्थबोध...(१)

जेव्हा वाद बनतो दहशतवाद ...

      करतो सगळ्यांना बरबाद!

जेव्हा वाद बनतो सुसंवाद ...

     बनतो सगळ्यांचा मदतीचा हात!

जेव्हा मान बनतो अपमान ...

    घालतो मनात सूडाचे थैमान!

जेव्हा मान बनतो सन्मान ...

    जागवतो मनात प्रेमभावना महान!

जेव्हा कृती बनते विकृती ...

    सुरू होते मनाची अधोगती!

जेव्हा कृती बनते संस्कृती ...

    होते लाखो मनांची उन्नती!

(क्रमश :)