सध्याच्या २४ तास मराठी बातम्या देणाऱ्या तीनही वाहिन्या!

बऱ्याच लोकांप्रमाणे मलाही वाटायचं की एखादी चोवीस तास मराठीतून (आणि मराठीपणा/मराठीपण जपणारी) बातम्या देणारी वाहिनी हवी.

पण तीन तीन मराठी-बातमी-वाहिन्या सुरू होवूनही मनाला म्हणावे असे समाधान वाटत नाही. कारण, या सर्व वाहिन्या म्हणजे शेवटी कोणत्या ना कोणत्या हिंदी-इंग्रजी न्यूज चॅनेल्सचीच अपत्ये आहेत. त्यात अस्सल मराठीपण जाणवत नाही. आताशा सुरू झालेली आय. बी. एन. लोकमत त्याच पठडीतली. आय. बी. एन. सांगेल तोच बातमीबद्दलचा "दृष्टीकोन" आय. बी. एन. लोकमतलाही मांडावा लागणार, असे मला वाटते. म्हणजे काय, फक्त भाषा बदलली पण बातमीचा "ऍटीट्यूड" शेवटी तोच! इतरांबद्दल तेच. ( उदाः झी न्यूज सांगेल त्याप्रमाणेच झी २४ तास बातमी देते की वेगळी? )

अस्सल स्वतंत्र मराठी न्यूज-चॅनेल हवे असे वाटत राहाते. रुखरूख लागून राहाते.

गेल्या वर्षा-दीड वर्षात अचानक एक, दोन नव्हे तर तब्बल तीन मराठी-बातम्या-वाहिन्या सुरू झाल्या, यामागे रहस्य काय? एखादी अस्सल स्वतंत्र मराठी वाहीनी सुरू होण्या आधीच, सगळ्या 'प्रस्थापित' वाहिन्यांना मराठी माध्यमांत (मेडियात) आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते का?

चर्चेचे मुद्दे :

  • तीनही वहिन्या आपल्या (अस्सल मराठी) वाटतात का? त्यांचा "दृष्टीकोन" त्यांच्या "नेटवर्क" पेक्षा वेगळा असतो का? (उदा: एखाद्या बातमीबद्दल जे स्टार न्यूज दाखवणार तेच मत स्टार मझा दाखवतं का? की वेगळे स्वतंत्र मत असते? काय आहे आपले निरिक्षण?
  • अचानक तीन वहीन्या सुरू होण्यामागचे रहस्य काय? "मराठी मेडीयात वर्चस्व" की "मराठीपणाबद्दल प्रेम" ?