कस्तुरी

हा मंद मंद, पवनी सुगंध
सळसळले कोण, दर्वळला गंध
आली कोठुनी, गेली कुणीकडे
उभे ठाकले, हे कोडे खडे
मी भारलो, अन हृरपलो
मजला करुनी बेधुंद धुंद..... बेधुंद धुंद
ती कस्तुरी.... ती कस्तुरी.... ती कस्तुरी....
अवचित झलक, दिसली अशी
नकळत पाडून, मजला फशी
मी शोधितो, धुंडाळितो
लावून गेली नवा छंद छंद.... नवा छंद छंद
ती कस्तुरी.... ती कस्तुरी.... ती कस्तुरी....
फिरे दशदिशा, चौफेर मी
दडली कुठे, ना कळे कामिनी
मना एक ध्यास, छवी पाहण्यास
आतुर जीव बेबंद बंद... बेबंद बंद
ती कस्तुरी.... ती कस्तुरी.... ती कस्तुरी....
ही ओढ अनामिक खुणविते
जागेपणी जणू स्वप्न ते
फिरुनी पुन्हा ये एकदा
नयनास लाभो गुलकंद कंद... गुलकंद कंद
ये कस्तुरी.... ये कस्तुरी.... ये कस्तुरी....