तू---
सुर्याच्या विखुरलेल्या किरणांसारखे
तुझे भास
ढगाढगांतून डोकावणारे
समुद्राच्या अविरत गाजेसारखी
तुझी साद
आसमंत व्यापून उरणारी
असिम पसरलेल्या या क्षितिजासारखा
तू---
नजरेच्या अल्याड--पल्याड--!
अन मी---
या ओथंबलेल्या वेड्या लाटेसारखी
लटक्या आभासामागे धावणारी
मनःपूर्वक!!!