आहे आणि नाही असा!

आहे आणि नाही असा!
.

संतत पडणारा पाऊस..
आहे आणि नाही असा!
पाना पानावर ओलावा..
आहे आणि नाही असा!

एकच थेंब खरा..
इथे तिथे विखुरलेला..

भुरभूर वारा;
बोचरा, कापरा!

थरथरती फांदी;
झटकत पानांना..?

टिप्प...

एक थेंब;
थेंबांना जोडणारा..
एक थेंब;
थेंबांनी जोडलेला...
आहे आणि नाही असा!!!

===================
स्वाती फडणीस......... ०४-०८-२००८