कटकट---कुणाची?

(आठ वर्षांच्या वरदाने लिहिलेलं नाटुकलं)

"मिनू ssssss ,! कुठे आहेस तू? " आई.
"आई, मी घरचा अभ्यास करतेय. " मनीषा.
"सोड तो गृहपाठ!  आधी मला मदत कर. "
"प्लीज, नको ना!  मला बाई रागावतील. "
"मिनू, आता मुकाट्याने ऊठ.  नाहीतर-----!  ते जाऊदे.  ऊठतेस की नाही? "
"नाही उठत जा!  सारखी आपली कटकट. "
"मिनू,--"
"तुम्ही मोठी माणसं सारखी कटकट करता बुवा!  एक मिनीट विश्रांती घेऊ देत नाही!"
"मिनू, उलट उत्तर देऊ नकोस!"  आई मिनूच्या खोलीत येत म्हणाली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.  बाबा आले.  आईला म्हणाले, "अगं सरिता, जरा पाणी दे गं!  घसा कोरडा पडलाय. "
"आत्ता आणते.  जरा एक मिनिट थांबा" सरिता.
एवढ्यात मिनू रडू लागली. रडत रडत म्हणाली, "बाबा, कंटाळा आला---"
"चूप बस! " बाबा--म्हणजे श्रीकांत.
--"आत्ताच दमून आलोय.  ऊठसूट कटकट करतेस! "  बाबा
"मनू, टी. व्ही. बघ. छान गोष्टी लागल्या असतील बघ. " आई.
"हां! " मिनू.
"टी. व्ही. बघायचा नाही. "बाबा.
"का? " मिनू.
(गालातल्या गालात हसत बाबा)-"चक्रम, उलट बघ तू.  छान कार्यक्रम लागलेत. मी आत्ताच बघितलं टी. व्ही. वर. "
"थँक्यू बाबा!"
_____________________________