एच आय व्ही

भयानकता मानवत्वाचि

समोर अक्राळ विक्राळ आ वासलेली,

अय्याशिच्या मग्रुरतेपासून

अजाणतेच्या अज्ञानापर्यंत

आणि अर्भकतेच्या असहायतेपासून

नशिबाच्या अवहेलने पर्यंत

अनेक केविलवाणे जीव

सहज सहन करतील विधात्याची मर्जी

जर मानवतेचे आधार म्हणवणारी

प्रतिष्टीत बुजगावणी

देहात जागवतिल

माणुसकिच्या ज्वाळा

आणि  शमवतिल त्या असुराला

ज्याला जग "एडस" म्हणून ओळखत