थोडंसच सांभाळावं लागतं आता...

थोडंसंच सांभाळावं लागतं आता,
आकाश निरभ्र असतानासुद्धा ;
कायमच जाळत जाणारे विजेचे लोळ
ऋतू बदलताना तेवढे त्रास देतात
एकदा झालेल्या बदलाला सरावलं झाड;
की पुन्हा राहतंच ताठ उभं
नव्या ऋतूच्या स्वागतासाठी.

.....................................

थोडंसं सांभाळावं लागतच...

श्यामली